जाहिरात
अपघात

गडचिरोली :कठाणी नदी पुलाजवळ काळाचा घाला! दुचाकीला पांढऱ्या रंगाच्या कारने उडवले; दोन कामगार जागीच ठार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १० नोव्हेंबर २०२६)

गडचिरोलीवरून डोंगरसावंगी येथे दुचाकीने जाणाऱ्या तिघांना भरधाव पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या इसमाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य एक जण जखमी झाला. मृत आणि जखमी तिघेही मिस्त्री कामगार होते. ही घटना ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गडचिरोली-आरमोरी मार्गावरील कठाणी नदी पुलाजवळ घडली.

मनोज शामराव सोनटक्के (वय ३२) आणि मानिक मुरलीधर कांबळे (वय ४०), अशी मृतांची नावे आहेत. तर कृष्णा अरुण घुटके (वय २७) हे जखमी झाले आहेत. तिघेही डोंगरसावंगी (ता. आरमोरी) येथील रहिवासी असून, मिस्त्री काम करून उदरनिर्वाह करीत होते. काम आटोपून तिघेही दुचाकीने गडचिरोलीवरुन आपल्या गावाकडे परत जात असताना कठाणी नदी पुलाजवळ अज्ञात पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी चालक घटनास्थळावरून निघून गेल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी कृष्णा घुटके यांच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भास्कर ठाकरे करीत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button