जाहिरात
ब्रेकिंग न्युज

गणवीर शिक्षक दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या; रेवतीनगरमधील घटना

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली/नागपूर (दि. १० नोव्हेंबर २०२६)

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात कार्यरत असलेल्या शिक्षक दाम्पत्याने नागपुरातील रेवतीनगर येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मनीष प्रल्हाद गणवीर (वय ३८) आणि सोनाली मनीष गणवीर (वय ३५) अशी मृत शिक्षकांची नावे आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे हे दाम्पत्य नागपुरातील मनीष यांच्या वडिलांच्या घरी आले होते. शनिवारी (७ नोव्हेंबर) दुपारी त्यांच्या घरातून मोठमोठ्याने भांडणाचे आवाज आले होते. त्यानंतर रविवारी (८ नोव्हेंबर) सकाळी नातेवाईक भेटायला आले असता, घर आतून बंद आढळले. खिडकीतून पाहिले असता दोघेही शयनकक्षात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले.

​मनीष आणि सोनाली यांनी पूर्वीच्या जोडीदारांपासून घटस्फोट घेतल्यानंतर, याच वर्षी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयीन विवाह केला होता. दोघेही अत्यंत मेहनती व अभ्यासू शिक्षक म्हणून ओळखले जात होते.
​या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून बेलतरोडी पोलीस ठाण्याचे पथक घटनेचा पुढील तपास करत आहे. या घटनेमुळे गडचिरोली व नागपूर शैक्षणिक वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button