जाहिरात
ब्रेकिंग न्युज

कुरखेडा : १४ वर्षीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

लोकशाही न्युज, कुरखेडा (दि.१२ ऑक्टोबर २०२६)

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात असलेल्या सोनसरी येथील आश्रमशाळेत एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१२ ऑक्टोबर) सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रानू क्रिष्णा हलामी वय १४ वर्ष असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती सोनसरी पासून तीन किमी अंतरावर असलेल्या मोहगाव येथील रहिवासी होती.

घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरु आहे.

दरम्यान, या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या देखरेखीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button