जाहिरात
ब्रेकिंग न्युज

गडचिरोली-चामोर्शी मार्गावर पोटफोळी नदी पुलावर एसटी बस पलटली, ३० प्रवासी जख्मी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१८ सप्टेंबर २०२६)

गडचिरोली चामोर्शी महामार्गांवर आज दुपारी २:३० वाजता च्या सुमारास नविन पुलाच्या बांधकाम सुरु असल्या ठिकाणी प्रवासी बस पलटून साधारणतः २५ ते ३० प्रवासी जख्मी झालेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.एसटी वाहनाचे स्टेरिंग लॉक झाल्याने ही घटना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या एम एच ०६- ८८४८ क्रमांकाच्या बसला शिवणी गावाजवळ अपघात झाला. बसचे अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर पलटी झाली. या दुर्घटनेत जवळपास ३० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, त्यापैकी २९ प्रवाशांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण ६८ प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये एका लहान चिमुकल्याचाही समावेश होता. अपघातानंतर सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत असून, काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button