जाहिरात
चामोर्शी

वनदाव्यासाठी आवश्यक कागदपत्रांची अडचण दूर करा

मानवाधिकार संघटनेची वनविभागाकडे धाव

Spread the love

लोकशाही न्युज, चामोर्शी (दि.२६ ऑक्टोबर २०२६)

चामोर्शी तालुक्यातील भाडभीडी (बी) येथील वनदावा धारक शेतकऱ्यांना वनदावा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले वनविभागाचे जीपीएस नकाशे, गुगल अर्थ नकाशे तसेच नमुना ‘अ’ मिळविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येची माहिती मिळताच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने तातडीने दखल घेत शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी मल्लेलवार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. तसेच, भ्रमणध्वनीद्वारे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनाही या समस्येबाबत अवगत करण्यात आले.

यानंतर भाडभीडी (बी) येथील शेतकऱ्यांना सोबत घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत वनदावा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या उपलब्धतेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करून जीपीएस नकाशे, गुगल अर्थ नकाशे आणि नमुना ‘अ’ उपलब्ध करून देण्यासंदर्भात संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.

वनदावा प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रे मिळविताना शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत आणि त्यांचे दावे सादर करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी वनविभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली

यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, युवा मोर्चा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद किरमे, सुरेश पाटील गुंतीवार, श्रीकांत वैरागडे, देविदास कुकडे, वासुदेव वैरागडे, विठ्ठल बुरांडे, ऋषी वासेकर, दिलीप देशमुख, महेश देशमुख, बंडू देशमुख, एकनाथ वासेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button