जाहिरात
आपला जिल्हाराजकीय

पंकज गुडेवार यांची गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती

Spread the love

लोकशाही न्यूज, गडचिरोली (दि.२४ ऑक्टोबर २०२६)

गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्याला बळकटी देण्याच्या दृष्टीने पंकज गुडेवार यांची गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत नियुक्तीपत्र जारी करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी जारी केलेल्या नियुक्तीपत्रानुसार, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून ही नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीबद्दल पंकज गुडेवार यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

या नियुक्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्षाचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविणे आणि आगामी काळात पक्षाची ताकद वाढविणे, यांसारखी आव्हाने त्यांच्या समोर असणार आहेत.

पंकज गुडेवार यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक सक्रिय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button