गडचिरोली : १५ ऑक्टोंबर ला रोकडे ज्वेलर्स च्या शोरूम चे भव्य उद्घाटन
उद्घाटनाला अभिनेत्री शिल्पा शिंदे येणार
लोकशाही न्यूज, गडचिरोली (दि.१३ ऑक्टोबर २०२६)
नागपूरमधील सुवर्ण व्यवसाय क्षेत्रात परिचित असलेल्या रोकडे ज्वेलर्सच्या नवीन दालनाचे उद्घाटन १५ ऑक्टोबर ला सकाळी ११ वाजता प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदे (भाभी जी घर पर है ) फेम व बिग बॉस विजेती हिच्या हस्ते होणार असल्याची माहिती आज (दि.१३ ऑक्टोबर ) ला हॉटेल लँडमार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेत रोकडे कुटुंबीयांनी दिली आहे.

(रोकडे ज्वेलर्स च्या शोरूम च्या उद्घाटनाला अभिनेत्री शिल्पा शिंदे येणार)
रोकडे ज्वेलर्स च्या नवीन दालनाचे उद्घाटन चंद्रपूर-मूल रोडवरील हॉटेल लँडमार्क च्या समोरील हॉटेल जिंजर येथे होणार आहे. गडचिरोली परिसरातील रहिवाशांना १००% हॉलमार्क असलेले सोने, डायमंड, पोलकी, कुंदन, ब्रायडल आणि चांदीच्या दागिन्याचे एक अनोखे आणि एक्स्प्लॉजिव कलेक्शन एकाच छताखाली उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली.
आज झालेल्या पत्रकार परिषदेला भैय्याजी रोकडे, वंदना रोकडे, राजेश रोकडे, सारंग रोकडे, पारस रोकडे, अनामिका रोकडे, संस्कृती रोकडे यांची उपस्थिती होती.
