जाहिरात
ताज्या घडामोडी

मुरमाडीत लांडग्यांचा शेळ्यांच्या कळपावर हल्ला; तीन शेळ्या ठार, तीन बेपत्ता!

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १७ ऑक्टोबर २०२६)

गडचिरोली मुख्यालयापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरमाडी जंगलात चारण्यासाठी नेलेल्या शेळ्यांच्या कळपावर लांडग्यांनी हल्ला केल्याची घटना मुरमाडी येथे घडली. या हल्ल्यात तीन शेळ्या जागीच ठार झाल्या असून, अन्य तीन शेळ्या बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.नुकसान झालेल्या बकरी मालकाचे नाव हंसराज गोविंदा कोहपरे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पशुपालक आपल्या शेळ्या जंगलात चारण्यासाठी घेऊन गेला असताना लांडग्यांनी शेळ्यांच्या कळपावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तीन शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन शेळ्या अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेमुळे पशुपालकाचे आर्थिक नुकसान झाले असून, त्याच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर नुकसान झालेल्या शेळ्यांचा पंचनामा करण्यासाठी वनविभागाच्या वनरक्षक कर्मचाऱ्यांना कळविण्यात आल्याचे संबंधित पशुपालकाचे म्हणणे आहे. मात्र, वनरक्षक पंचनामा करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप पशुपालकाने केला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नुकसान होऊनही शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वनविभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करावी, मृत व बेपत्ता शेळ्यांबाबत नियमानुसार पंचनामा करावा आणि पात्र पशुपालकाला शासनाच्या नियमांनुसार नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button