जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली :जपतलाई आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण, संस्था सचिव ॲड. विश्वजीत कोवासे यांना अटक

माजी खासदार मारोतराव कोवासे अद्यापही फरार

Spread the love

लोकशाही न्युज,​गडचिरोली (दि.२० सप्टेंबर)

धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेचे सचिव तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी (पीसीआर) सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले संस्था अध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे हे अद्यापही फरार आहेत.

जपतलाई येथील आश्रमशाळेत १० ऑगस्टच्या रात्री सर्पदंश होऊन तीन निष्पाप विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. प्रशासनाने कारवाई करत शाळेचे अधीक्षक, अधीक्षिका आणि मुख्याध्यापकासह संस्था अध्यक्ष व सचिवावर गुन्हे दाखल केले होते.
यापूर्वी अधीक्षक, अधीक्षिका आणि मुख्याध्यापक अशा तिघांना अटक करण्यात आली होती.

​जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर संस्था अध्यक्ष मारोतराव कोवासे आणि सचिव विश्वजीत कोवासे हे पिता-पुत्र फरार झाले होते. दोघांनीही अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, दोन्ही न्यायालयांनी त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले.
​शुक्रवारी पोलिसांनी विश्वजीत कोवासे यांना ताब्यात घेतले. अटकेनंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्यांना गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची धानोरा पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दुसरीकडे, फरार असलेले माजी खासदार मारोतराव कोवासे यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button