जाहिरात
आपला जिल्हाराजकीय

गडचिरोली : हजारो शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक!

पवन गेडाम यांच्या नेतृत्वात विराट आंदोलन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.३ नोव्हेंबर २०२६)

शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी तसेच विविध ज्वलंत मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी १२.०० वाजता या मोर्चाची सुरुवात चामोर्शी रोडवरील शिवसेना पक्ष कार्यालयातून झाली. पक्ष कार्यालय, इंदिरा गांधी चौक असा करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर १ वाजता धडकला.

वनहक्क पात्र कायद्यानुसार सन वनहक्कधारकांना २००५ च्या अगोदरचे किंवा त्यानंतरचे पुरावे विचारात घेऊन वनहक्क पट्टे देण्यात यावेत. संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. यासह विविध मागण्या या मोर्चातून करण्यात आल्या.

जिल्हाप्रमुख पवन गेडाम मोर्चाला संबोधन करताना 

जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीचे आवाहन
!!!
जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर शासन आणि प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन जनतेला न्याय द्यावा, या मागणीसाठी हा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी बांधव, वनहक्कधारक, विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या न्याय्य हक्कांसाठी आवाज बुलंद केला.

मोर्चातील प्रमुख मागण्या
!!!
वन अतिक्रमण धारकांचे पट्टे २००५ च्या अगोदरचे असो किंवा नंतरचे त्यांना सरसकट पट्टे देण्यात यावे.संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा.शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरसकट मुक्त करा.स्मार्ट मीटर काढण्याबाबत तातडीने निर्णय घ्या.गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा- मुरुमगांव राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० चे पक्के बांधकाम तातडीने पूर्ण करा.गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा.
शासकीय व आश्रमशाळा वसतीगृहांतील सुविधा दर्जेदार करा.
धानाला हमीभावाव्यतिरिक्त अतिरिक्त बोनस देण्यात यावे.
निवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाव्यतिरिक्त अतिरिक्त बोनस देण्यात यावा.

या मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख पवन राघोजी गेडाम, सह संपर्क प्रमुख श्रीकांत बंसोड, विधानसभा संघटक नंदू कुमरे, माजी जिल्हा संघटक विलास ठोंबरे, युवा सेना जिल्हाप्रमुख गुणाजी बोरकुटे, पप्पु शेख शहर प्रमुख गडचिरोली, तालुका प्रमुख गडचिरोली घनश्याम कोलते, तालुका प्रमुख गोविदा बाबनवाडे, गडचिरोली, तालुका प्रमुख संतोष लोनबले धानोरा, तालुका प्रमुख शेडमाके धानोरा, तालुका प्रमुख मनोज पोरटे चामोर्शी, तालुका प्रमुख विलास ठाकरे वडसा, तालुका प्रमुख सदाशिव गहाणे कोरची, तालुका प्रमुख आशिष काळे कुरखेडा, उप तालुका प्रमुख होमराज गायकवाड वडसा, शहर प्रमुख विश्वास सहारे वडसा, युवा नेते अमोल कुळमेथे,युवा नेते तुषार मडावी माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य वेणुताई ढवगाये आरमोरी, चेतन उरकुडे युवा सेना उपजिल्हा प्रमुख, युवा सेना तालुका प्रमुख वैभव सातपुते गडचिरोली, युवा सेना शहर प्रमुख अतुल नैताम, गडचिरोली विधानसभा प्रमुख युवा भुषन पोरटे, आरमोरी तालुका प्रमुख देवीदास काळबांधे, तालूका प्रमुख लहानु पील्लारे आरमोरी, सदस्य दिगांबर मेश्राम, यांच्या सह महीला आघाडी, युवा सेना, शेतकरी, शेतमजुर, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button