१ कोटी ४६ लाखांच्या अंमली पदार्थासह ८ जण जेरबंद

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. २ नोव्हेंबर २०२६)
जिल्ह्यात अंमली पदार्थांची अवैध तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा गडचिरोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोमके गट्टा (फु) पथकाने संयुक्त कारवाई करत ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पेंढरी उपविभाग हद्दीत ८ जणांना ताब्यात घेतले.
घटनेतील आरोपी खालील प्रमाणे १)अनिशकुमार पोंदी (वाहन चालक)देवी चौक पटनमपारा, जि. सुकमा (छ.ग.)२)हिमांशू नायक (प्रवासी) सुकमा (छ.ग.)
३) परमब परिमलदास (प्रवासी)
बागीचापारा, जि. सुकमा (छ.ग.)
४) शंकर कोसा माडवी
पुसमीपारा, ता. जि. सुकमा (छ.ग.)
५)भूपेश धनसुराम कोमरे
बोळको, ता. कोंटा, जि. सुकमा (छ.ग.)
६) सुनील रामनाथ मंडावी
सुडीपारा वार्ड नं. ०१, ता. जि. सुकमा (छ.ग.)
७) अमोल बळीराम दोरगे
पारोडी बोरोडी, ता. आष्टी, जि. बीड
८)विशाल गोवर्धन दोरगे
पारोडी बोरोडी, ता. आष्टी, जि. बीड
वरील आरोपींकडून २४०.५ किलो ग्रॅम अंमली पदार्थ (अंमजी अंदाजे किंमत १ कोटी २० लाख रुपये) आणि तीन वाहने व मोबाईल असा एकूण १ कोटी ४६ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी उपपोस्टे पेंढरी येथे एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व ८ आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कपिल आगलावे करीत आहेत.
