जाहिरात
धानोरा

वाघाच्या दहशतीखाली धानोरा तालुका! शेतकरी मृत्यूनंतर आमदार डॉ. मिलिंद नरोटे आक्रमक, वनविभागाकडे सुरक्षेची मागणी

Spread the love

लोकशाही न्युज, धानोरा (दि. २९ ऑक्टोबर २०२६)

धानोरा तालुक्यातील तुळमेर येथील शेतकरी शांतराम मडावी यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मनाला चटका लावणारी आहे. शेतातील धानपिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मडावी यांच्यावर वाघाने हल्ला केला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मडावी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. कुटुंबातील व्यक्ती गमावण्याचे दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. या कठीण प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

त्यानंतर गावकऱ्यांशी चर्चा करून परिसरातील परिस्थिती जाणून घेतली. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाघाच्या हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतात पीक उभे आहे, शेतीची कामे सुरू आहेत; मात्र शेतात जातानाही जीवाची काळजी करावी लागत आहे. कष्टाने पिकवलेले धान वाचवताना शेतकऱ्यांना स्वतःच्या जीवाचा धोका पत्करावा लागत असेल, तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

यावेळी उपस्थित वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी गावकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या सुरक्षेचे प्रश्न मांडले. परिसरात नियमित गस्त वाढवणे, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे याबाबत वनविभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली.

शेतकऱ्यांनी शेती करावी की जीवाच्या भीतीने शेतात जाणे टाळावे, असा प्रश्न निर्माण होणे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांचा जीव महत्त्वाचा आहे. नागरिकांना सुरक्षित वातावरणात जगता यावे आणि शेतकऱ्यांना कोणतीही भीती न बाळगता शेतीची कामे करता यावीत, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलणे आवश्यक आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी वनविभागाने ठोस कार्यवाही करावी, अशी भूमिका आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी यावेळी मांडली.

याप्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय कुमरे, भाजपा जिल्हा सचिव सारंग साळवे, भाजपा तालुका कोषाध्यक्ष सुभाष खोबरे, नगरपंचायत धानोरा गटनेते तथा नगरसेवक संजय कुंडू, नंदू शेंद्रे, दौलत वरवडे, रतन विश्वास,हरिश माकडे, सुभम बालेकरमकर, यश कोंडावार, सतीश पेंदोरकर, तहसीलदार गणेश माळी, वनपरिक्षेत्र अधिकारी नामदेव बनसोड, तलाठी ज्योती ठेंगरी, तलाठी दिनेश पदा तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button