जाहिरात
धानोरा

धानोरा : तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना वन हक्क पट्टे दया

बीआरएसपी पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

Spread the love

लोकशाही न्युज, धानोरा (दि.५ ऑक्टोबर २०२६)

धानोरा तालुक्यातील वन हक्क पट्टे भूमी शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मागील अनेक वर्षापासून जमिनीवर अनेक भूमी शेतकरी शेती करून आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत धानोरा तालुक्यातील मौजा पयडी, पैकीन मुडझा,मुद्दा मक्केपल्ली, मुस्का, निमगाव, बाकरुंडी व इतर गावातील जवळपास ५० लोक सहभागी होते.

भूमिहीन शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर केले असून सुद्धा अद्यापही प्रकरण निकाली न काढल्याने प्रत्यक्षरीत्या दिसून येत आहे तसेच आपली यंत्रणा या प्रशासनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे करिता संबंधित असलेल्या त्रुटी त्वरित निकाली काढून धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना वनपट्टे देण्यात यावे. जेणेकरून सदर शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे तसेच शेतीतून अधिक उत्पादन घेण्याकरीता आवश्यक सामग्री शासनाकडून मिळण्यास मदत होईल यासंदर्भात धानोरा तहसीलदार यांच्याशी विस्तृत अशी चर्चा करून संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या निर्देशानुसार तहसीलदार धानोरा यांनी धानोरा तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत च्या ठिकाणी शिबिर आयोजित करण्याचे ठरविलेले आहे.

तसेच सॅटलाईट जमिनीची अतिक्रमण नोंदणी आहे किंवा नाही यासंदर्भात सुद्धा ड्रोन च्या साह्याने अतिक्रमणाची नोंदणी घेण्यात येईल तसेच गावातील वृद्ध वयोवृद्ध ज्यांची वय ७० ते ९० वयोगटातील व्यक्तीकडून जमिनीचे अतिक्रम आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यात येईल त्यानंतर २००५ वर्षांपूर्वीचा पुरावा असणे बंधनकारक राहील त्या संबंधित कागदपत्रे अधिकार अभिलेख पंजी,पी नाईन, पन्नास वर्षांपूर्वीचा दाखला या सर्व बाबींची नोंद घेऊन भूमी शेतकऱ्यांना न्याय देण्यास सहकार्याच्या भूमिका आमची राहील अशी आश्वासन देऊन निवेदनाचा स्वीकार केला.

याप्रसंगी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी रामटेके, तालुका सचिव चंद्रकांत रायपुरे,विदर्भ कमिटी सदस्य मिलिंद बांबोडे व इतर पक्षातील कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button