जाहिरात
आपला जिल्हा

घोट क्षेत्रातील १४ गावांच्या सिंचन व शेतीपट्ट्यांचा प्रश्न मार्गी लावणार

मंजेगाव येथे मुख्यमंत्री ओएसडी अनिरुद्ध पालकर यांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद

Spread the love

लोकशाही न्युज, चामोर्शी /घोट (दि.५ ऑक्टोबर २०२६)

रेगडी-हळदवाही क्षेत्रातील १९५८ पासून शेतीचे पट्टे मिळण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न तसेच घोट क्षेत्रातील १४ गावांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) अनिरुद्ध पालकर यांनी दिले.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद नरोटे व माजी खासदार अशोक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली मंजेगाव येथे स्थानिक सात गावांतील शेतकऱ्यांसोबत पालकर यांचा थेट संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. विशेषतः घोट क्षेत्रातील १४ गावांच्या सिंचनाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सिंचनाच्या प्रश्नासंदर्भात पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी रोशन मेश्राम व अभियंता विकास दूधबावरे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, डॉ. भारत खटी यांनीही मार्गदर्शन केले. माजी खासदार अशोक नेते यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना अनिरुद्ध पालकर म्हणाले की, जिल्ह्यातील सर्वसामान्य व गोरगरीब शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे काम सुरू असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच घोट भागातील १४ गावांतील नागरिकांच्या प्रश्नांवरही शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला मंजेगाव, किसाननगर, मछली, चक चापलवाडा, जवाहरनगर, सिमूलतला, हळदवाही, हळदवाहीटोला, पेटतळा व भाडभीडी आदी भागांतील शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू उपाध्ये, किशोर कुंडू, दिनेश मुजुमदार, विनोद किरमे, पलास घरामी, सुमेन विश्वास, राजू सातपुते, संदीप भोवरे, जितेन शहा, अंकुश तरफदार, आयोजक माजी सरपंच रमेश लेकलवार, बाबुराव बर्लावार, विठ्ठल बोंमकंटिवार, वर्षा गर्तूलवार, गंगाधर रामटेके, विनायक डुबूलवार, वसंत तुंकलवार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गोरडवार यांनी केले, तर आभार रवींद्र गर्तूलवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंजेगाव येथील शेतकरी, पदाधिकारी व युवकांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button