जाहिरात
राजकीय

“NH 930 बनला जीवघेणा; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची मागणी”

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आंदोलनाचा इशारा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.७ ऑक्टोबर २०२६)

गडचिरोली जिल्ह्यातून छत्तीसगड राज्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० (NH-930) ची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पवन राघोजी गेडाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, अपघाताचा धोकाही वाढला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातून छत्तीसगड राज्याकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत, खराब झालेल्या भागांची दुरुस्ती करावी तसेच आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरणाची कामे करावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाप्रमुख पवन राघोजी गेडाम यांनी दिला आहे.

यासंदर्भात जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही देण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गडचिरोली लोकसभा प्रमुख महेश केदारी, सहसंपर्क प्रमुख डॉ. बनसोड, जिल्हाप्रमुख पवन गेडाम, संघटक नंदू भाऊ कुंभरे, उपजिल्हाप्रमुख अतुल नैताम, शहरप्रमुख पप्पू शेख, युवासेना शहरप्रमुख प्रफुल्ल कोसे, युवासेना उपजिल्हाप्रमुख चेतन उरकुडे, अमोल कुळमेथे, माजी सरपंच तुषार मडावी यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button