गडचिरोली : लोकसभा संपर्क प्रमुख महेश केदारी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा) पक्षात शेकडो युवकांचा जाहीर पक्षप्रवेश

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.५ ऑक्टोबर २०२६)
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) गडचिरोलीचे शहराध्यक्ष अमोल कुळमेथे यांच्यासह विविध पक्षाच्या युवकांचा शिवसेना (उबाठा) पक्षप्रवेश
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची विचारधारा, पक्षाचे नेतृत्व तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पक्षाची भूमिका यावर विश्वास व्यक्त करत गडचिरोली शहरातील विविध क्षेत्रातील युवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात अमोल कुळमेथे, सरपंच संघटनेचे जिल्हा संघटक माजी सरपंच तुषार मडावी, महंमद शेख, आदिल शेख, तिवारीलाल भोयर, पंकज बांनबले, अमन मुन्घाटे, अपूर्व मडावी, गौरव हरणे, गौरव लोणबले, अभिषेक चन्नवार, दयेश मोहुरले, सूरज लेनगुरे, भार्गव मांदाळे, सुशांत सोनुले, सुमित लोनबले, दीपांशू डोमळे, साहिल लेनगुरे, नंदकिशोर लेनगुरे, रितिक वाढई, योगीराज सहारे, राकेश सहारे, गणेश गुरुनुले, साहिल मडावी, अमित उसेंडी, शुभम मोहुरले, अमर ठाकरे आणि कैलास आदे यांनी पक्षात प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे गडचिरोली शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी मजबूत होण्यास मदत होणार असून, नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागातून पक्षाची विचारधारा आणि संघटन तळागाळापर्यंत पोहोचविण्यास अधिक बळ मिळणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
या यशस्वी पक्षप्रवेश वेळी उपस्थित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकसभा प्रमुख महेश केदारी, सहसंपर्क प्रमुख, संघटक, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पवन गेडाम तथा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नव्याने पक्षात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
