जाहिरात
आपला जिल्हा

शिक्षक संघटनेच्या वतीने धनंजय दुम्पेट्टीवार यांचा सत्कार

Spread the love

लोकशाही न्युज, (दि. ४ ऑक्टोबर २०२६)

जिल्हा परीषद च्या प्राथमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी धनंजय दुम्पेट्टीवार यांना ३० सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रेरक उजगरे आणि उपशिक्षणाधिकारी संजीव पारसेवार उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षण विभागातील त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध शिक्षक व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले होते. संघटनांच्या संयुक्त सहभागातून झालेल्या या सत्काराला जिल्ह्यातील शिक्षक प्रतिनिधींची उपस्थिती लाभली.

विविध शिक्षक संघटनांचा संयुक्त सहभाग
!!
कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हा सरचिटणीस अशोक रायसिडाम आणि जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक समितीचे मार्गदर्शक धनपाल मिसार, जिल्हाध्यक्ष योगेश ढोरे आणि आशिष धात्रक यांनीही उपस्थिती दर्शविली.

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश साखरे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चक्रपाणी कन्नाके, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख आणि शिक्षक परिषदेचे साळवे यांचाही कार्यक्रमात सहभाग होता.

याप्रसंगी अविनाश तालापल्लीवार, गुरुदेव नवघडे, बापू मुनघाटे, राजकुमार घोडेस्वार, कोमरेवार, अनिल मुलकलवार, विजय बन्सोड तसेच विस्तार अधिकारी यांची उपस्थिती होती.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button