जाहिरात
ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२ ऑक्टोबर २०२६)

गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात व आदरपूर्वक वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलताना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. माधव शिंदे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनप्रवासावर, त्यांच्या आदर्शांवर आणि देशासाठी दिलेल्या अमूल्य योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला. गांधीजींचे सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचे विचार तसेच शास्त्रीजींचा साधेपणा, कणखर नेतृत्व आणि ‘जय जवान, जय किसान’ हा नारा आजही प्रत्येक नागरिकासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे, असे विचार डॉ. शिंदे यांनी आपल्या भाषणातून मांडले.

या प्रसंगी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोटूळे, धानोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जोगदंड, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी संजू पारसेवार, प्रशासकीय अधिकारी शंतनू पाटील, अधीक्षक श्रीमती सरिता जल्लेवार, सहायक प्रशासन अधिकारी योगेंद्र वैद्य, सहायक प्रशासन अधिकारी पाथकमवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीमती दाऊवार मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला शिक्षण विभाग तसेच आरोग्य व इतर विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय सुरळीत पार पडून उपस्थितांनी महापुरुषांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प केला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button