जाहिरात
धानोरा

दुचाकीच्या अपघातात दोन जखमी, सोडे आश्रम शाळे समोरील घटना

Spread the love

लोकशाही न्युज,धानोरा (दि,१२ एप्रिल)
दोन दुचाकीची समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना धानोरा-रांगी मार्गावरील सोडे गावाजवळील आश्रमशाळेजवळ आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. झालेल्या दुचाकीच्या अपघातात प्रफुल तोफा (२४) रा. तुकूम, देवदास पदा (३०) रा. नवरगाव अशी जखमींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, धानोरा तालुक्यातील तुकूम येथील प्रफुल तोफा हा आपल्या वैयक्तिक कामासाठी जांभळीकडे दुचाकीने जात होता. अशातच दुसरी दुचाकी नवरगावमार्गे धानोरा शहराकडे येत होती. धानोरापासून अवघ्या दोन किमी अंतरावर सोडे आश्रमशाळेजवळ दोन्ही दुचाकींची समोरा-समोर धडक झाली. या अपघातात प्रफुल तोफा व देवदास पदा हे दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले.

अपघाताच्यावेळी देवदास पदा यांच्या दुचाकीवर एक महिला सुद्धा होती. मात्र, सुदैवाने सदर महिलेला दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच धानोरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास धानोरा पोलिस करीत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button