जाहिरात
आपला जिल्हा

आरमोरी-वडसा रेल्वे ची चाचणी पुर्ण

जिल्हा वासियांचे नियमित सेवेकडे लक्ष

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि.२१ सप्टेंबर २०२६)

गडचिरोली जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित रेल्वे विकासाला आता प्रत्यक्ष गती मिळताना दिसत आहे.
वडसा-गडचिरोली या सुमारे ५२ किलोमीटर रेल्वेमार्ग असुन, वडसा -आरमोरी या १८ किलोमीटर चे काम जवळपास पूर्ण झाले आहे या मार्गावर आज (दि.२१ सप्टेंबर) ला पॅसेंजर रेल्वेगाडीची पहिल्यांदाच चाचणी घेण्यात आली. त्यामुळे या मार्गावर नियमित प्रवासी रेल्वे सेवा सुरू होऊन दळणवळण साठी जनते कडुन मोठया अपेक्षा आहेत. ही सेवा नियमित करावी अशी मागणी जिल्हा वासियांकडून जोर धरू लागली आहे.

वडसा-आरमोरी रेल्वे मार्ग हा जिल्ह्यातील वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर पॅसेंजर रेल्वेची चाचणी धाव झाल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या रेल्वे नकाशावर आणखी एक महत्त्वाची कडी जोडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या रेल्वेसेवेमुळे आरमोरी, वडसा तसेच परिसरातील नागरिकांना शिक्षण, रोजगार, व्यवसाय, आरोग्यसेवा आणि इतर कामांसाठी प्रवास करणे अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी रेल्वे वाहतूक उपलब्ध झाल्यास वेळ आणि प्रवासाचा खर्चही कमी होण्यास मदत होऊ शकते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button