जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली : ५ नोव्हेंबर ला श्री साई मंदिर व श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठानतर्फे भव्य ‘दीपोत्सव सोहळा’

Spread the love

लोकशाही न्युज , गडचिरोली (दि. ४ नोव्हेंबर २०२६)

श्री साई मंदिर, चामोर्शी रोड, गडचिरोली व श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘सेवेची १ वर्ष’ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका भव्य ‘दीपोत्सव सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन ​ गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६
​वेळ: सायंकाळी ५ वाजता
​स्थळ: श्री साई मंदिर, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे करण्यात आले आहे.

​कार्यक्रमाचे विशेष आकर्षण
!!
या दिपोत्सवाच्या निमित्ताने श्री साई बाबांच्या चरणी दिव्यांची आरास लावून आपल्या जीवनातील अंधार, दुःख आणि तिमीर जाळून सुख, आनंदाचा प्रकाश जीवनात आणण्यासाठी दीपदानायच्या माध्यमातून बाबांना प्रार्थना केली जाणार आहे.
​तरी सर्व साईभक्तांनी या धार्मिक व मंगलमय कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिपोत्सवाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button