
लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२७ सप्टेंबर २०२६)
गडचिरोली परिसराचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले प्रसिद्ध हजरत जिलानी सरकार (जिलानी बाबा) यांचे (दि.२७ सप्टेंबर) ला वृद्धाप काळाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण विदर्भासह सीमावर्ती भागातील लाखो अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.
हिंदू-मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान
!!
जिलानी बाबा हे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांचे श्रद्धास्थान होते. सन १९९६ पासून गडचिरोली येथे वास्तव्यास राहून त्यांनी लाखो भक्तांना आध्यात्मिक आधार दिला. सर्वधर्मसमभावाचा संदेश देत त्यांनी समाजातील विविध घटकांना जोडण्याचे कार्य केले.
त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने येत असत. त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या अनुयायांकडून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांचा अंत्यविधी पाल नदी आरमोरी रोड येथे होणार आहे.
