जाहिरात
आपला जिल्हा

संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

दोन तालुके दुष्काळ घोषित करून काय साध्य झाले? शिवसेना जिल्हाध्यक्ष पवन गेडाम

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२८ सप्टेंबर २०२६)

जिल्ह्यात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक भागांतील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासनाने केवळ दोन तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याऐवजी संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष पवन राघोजी गेडाम यांनी केली आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण व वितरण असमान राहिल्याने शेती पिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. काही भागात अतिवृष्टी, तर काही भागात पावसाची कमतरता यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत केवळ दोन तालुक्यांना दुष्काळाच्या निकषात समाविष्ट करून उर्वरित जिल्ह्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, असे गेडाम यांनी म्हटले.

“दोन तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून काय साध्य झाले? जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील शेतकरीही संकटात आहेत. त्यामुळे शासनाने संपूर्ण जिल्ह्याचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा,” अशी मागणी पवन राघोजी गेडाम यांनी केली.

दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतर शेतकऱ्यांना शासनाच्या विविध मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे शासनाने तातडीने सर्व तालुक्यांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button