गडचिरोली : लॉयड्सकडून भामरागडा तील ३ गंभीर रुग्णांना एअरलिफ्ट

लोकशाही न्युज,भामरागड/हेडरी (दि.२८ सप्टेंबर २०२६)
भामरागड परिसरात आलेल्या भीषण पुरामुळे अनेक गावांचा रस्ता व वाहतूक संपर्क पूर्णपणे विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने आपत्कालीन वैद्यकीय मदतकार्य हाती घेतले. पूरग्रस्त आणि संपर्क तुटलेल्या भागातील तीन गंभीर रुग्णांना एअरलिफ्ट करून हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल येथे पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
२७ सप्टेंबर रोजी ही आपत्कालीन कारवाई करण्यात आली. पुराचे पाणी वाढल्याने जमीनीवरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे प्रभावित झाली होती. अशा परिस्थितीत तीन रुग्णांना हवाई मार्गाने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यासोबतच पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी लॉयड्सने वैद्यकीय पथके, आवश्यक औषधे आणि मेडिकल कंज्यूमेबल्सचीही व्यवस्था केली आहे.
एअरलिफ्ट करण्यात आलेल्या तीन रुग्णांमध्ये
अपेक्षा रुशी आलम वय २५वर्ष ,रोशन चिन्ना मडावी वय २१वर्ष ,संगीता चुक्कू उसेंडी वय वर्ष वय ७ वर्ष
तिन्ही रुग्णांना पूरग्रस्त भागातून सुरक्षितपणे एअरलिफ्ट करून थेट लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल हेडरी येथे आणण्यात आले. त्यांना संबंधित उपचार विभागात दाखल करण्यात आले असून बालरोग तज्ज्ञ डॉ. बालाजी व्ही. आणि डॉ. स्वाती रेड्डी, तसेच फिजिशियन डॉ. पोरस यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, सातत्याने निरीक्षण आणि वेळेवर करण्यात आलेल्या वैद्यकीय उपचारांनंतर तिन्ही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
श्री.बी.प्रभाकरन,व्यवस्थापकीय संचालक
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड
!!
पूरामुळे कुटुंबांना अनिश्चितता आणि अडचणींचा सामना करावा लागत असताना त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आमची पहिली जबाबदारी आहे. आमच्यासाठी हे केवळ मदत पुरवण्यापुरते मर्यादित नाही, तर गरजेच्या वेळी नागरिकांच्या सोबत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे दायित्व आहे. तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना विलंब न होता उपचार मिळावेत यासाठी आम्ही आमचे डॉक्टर आणि आपत्कालीन एअरलिफ्ट सुविधा तैनात केली आहे. यासोबतच प्रभावित कुटुंबांना फूड किट आणि आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी आमची पथके कार्यरत आहेत. परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत आम्ही या समुदायांच्या पाठीशी उभे राहून सर्वतोपरी मदत सुरू ठेवू.
