जाहिरात
आपला जिल्हा

जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करा

७० वर्षीय निराधार दांपत्याची पत्रकार परिषद

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १६ नोव्हेंबर २०२६)

गडचिरोली तालुक्यातील कुनघाडा जवळील नवेगांव (रै) येथील कनगंतुलवार निराधार कुटुंबाच्या घरासमोर याच गावातील विनायक भांडेकर, आदेश भुरसे, विशाल सिडाम,यश भांडेकर, गोकुळ भांडेकर, रुपाली भांडेकर आदिनी दिपावालीच्या दुसऱ्या दिवशी (दि. १२ नोव्हेंबर गुरुवार ला रात्री ९ वाजता) लोकनाथ जक्काजी कनगंतुलवार वय ७० वर्ष यांचे कुटुंब झोपले असतांना वरील गैर अर्जदारांनी फटाके फोडून घरावर फेकले, सदर कुटुंबांना धरून घराबाहेर काढले, एवढेच नव्हे जातीवाचक शिविगाळ केली.

जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांना
ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ७० वर्षीय
कनगंतुलवार या निराधार वृद्ध दाम्पत्यांनी केली आहे.

सदर प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशन गडचिरोली दिली असता तक्रार घेण्यास नकार देता देता शेवटी रिपोर्टे N.C केली.सदर प्रकरणात एवढे घडून सुद्धा गडचिरोली पोलिसांनी गैरअर्जदारावर गुन्हा नोंदवला नाही त्यामुळे आमच्यावर झालेला अन्याय आहे तेव्हा गडचिरोली पोलीसांनी व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सदर प्रक्ररणाची नोंद घ्यावी व गुन्हा दाखल करावा अन्यथा येत्या ५ दिवसात कनगंतुलवार निराधार दांपत्य पोलीस  स्टेशन गडचिरोली समोर उपोषणाला बसण्याचा ईशारा दिला आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेला पत्रकार परिषदेला लोकनाथ कनगंतुलवार, कमलबाई कनगंतुलवार, श्यामला गोरडवार, सविता लाटेलवार, कल्पक चंद्रगिरे, यांचेसह विजय देवतळे राज्य उपाध्यक्ष समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, किशोर नरुले प्रदेश सचिव, राकेश बोरकर जिल्हा अध्यक्ष, माया मोहरले, देवाजी लाटकर उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button