जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली : आदिवासींचा ‘गौरव’ की विनाशाचा डाव?

लोहखाणींच्या मुद्द्यावरून शेकापचा सरकारवर गंभीर आरोप

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १४ नोव्हेंबर २०२६)

क्रांतिकारी बिरसा मुंडांच्या १५१ व्या जयंतिनिमित्य गडचिरोली येथे आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या आडून स्थानिक आदिवासींच्या अस्तित्वावर गदा आणत येथील जल, जंगल, जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाळणे हाच शासनाचा डाव असल्याचे दिसून येत आहे. शासनाला आदिवासींबाबत एवढीच सन्मानाची भावना आहे तर आधी गडचिरोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर जंगल आणि नैसर्गिक संसाधने उध्वस्त करणाऱ्या प्रस्तावित लोहखाणी आणि प्रकल्प तातडीने रद्द करुन आदिवासींचा गौरव करावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, आपल्या नेतृत्वातील भांडवलदार धार्जिण्या सरकारने गडचिरोली जिल्ह्यात लागू असलेल्या पाचव्या अनुसूचीची तमा न बाळगता पेसा – वनाधिकार कायद्यांची व पारंपरिक ग्रामसभांना असलेल्या अधिकारांची वासलात लावत बळजबरीने आणि बेकायदेशीर पध्दतीने अतिअसूरक्षीत आदिवासी भागात लोह खाणी प्रस्तावित करण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे येणाऱ्या काळात आदिवासींच्या प्रथा, परंपरा, संस्कृती सह निसर्ग आणि पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष व आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. विस्थापन आणि असाय्यतेची स्थिती निर्माण करून आदिवासींच्या अस्तित्वाला बाधा आणणारी आपल्या सरकारची भूमिका येथील आदिवासींचा कोणता गौरव करणार आहे.

आश्रमशाळांतील चार आदिवासी मुलींचा बळी घेणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेला पाठीशी घालत, जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य केंद्र प्रभारींच्या भरोश्यावर ढकलून शासन आदिवासींचा गौरव करण्याच्या बाता करत असेल तर या गौरवाचा आम्ही जिल्हा वासियांच्या वतीने तीव्र निषेध करतो, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

शासनाला आदिवासींबाबत एवढीच सन्मानाची भावना असेल तर क्रांतिकारी बिरसा मुंडांच्या विचारांचा आदर्श ठेवून गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्तावित आणि मंजूर सर्व विनाशकारी लोह खाणी व प्रक्रिया प्रकल्प तातडीने रद्द करुन येथील आदिवासींचा, त्यांच्या संस्कृती – सभ्यतेचा सन्मान करावा, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button