जाहिरात
ताज्या घडामोडी

‘जनजातीय गौरव दिवस’ नव्हे, ‘जागतिक आदिवासी गौरव दिवस’ म्हणा

शब्दप्रयोगावरून आदिवासी समाजात नाराजी; शिवसेना जिल्हाध्यक्ष पवन गेडाम यांचा तीव्र निषेध

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १४ नोव्हेंबर २०२६)

आदिवासी समाज हा या देशाचा मूळ निवासी असून, त्यांची ऐतिहासिक ओळख, संस्कृती आणि अस्मितेचा सन्मान राखला गेला पाहिजे. मात्र, ‘जनजातीय गौरव दिवस’ या शब्दप्रयोगामुळे आदिवासींच्या मूळ निवासी असण्याच्या ऐतिहासिक ओळखीला अपेक्षेप्रमाणे महत्त्व मिळत नाही आणि इतिहासाच्या व्यापक अर्थाला मर्यादा येतात, अशी ठाम भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष पवन गेडाम यांनी मांडली आहे. या शब्दप्रयोगाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आदिवासी समाजाच्या वतीने या नामाचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

​इतिहासाचा अर्थ सीमित होतो,, पवन गेडाम
!!
या मुद्द्यावर बोलताना पवन गेडाम म्हणाले की, आदिवासी समाजाने हजारो वर्षांची समृद्ध संस्कृती, स्वतंत्र परंपरा, भाषा, कला आणि ऐतिहासिक वारसा अत्यंत निष्ठेने जतन केला आहे. अशा गौरवशाली समाजाचा दिवस साजरा करताना ‘जागतिक आदिवासी गौरव दिवस’ असा सन्मानपूर्वक शब्दप्रयोग केला गेला असता, तर संपूर्ण आदिवासी समाजाला अधिक आत्मीयता आणि सन्मान वाटला असता. मात्र, ‘जनजातीय’ शब्दाचा वापर केल्यामुळे त्यांच्या मूळ ऐतिहासिक ओळखीला अपेक्षित न्याय मिळत नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

अस्मितेचा आणि अस्तित्वाचा योग्य आदर व्हावा
!!
आदिवासी समाजाला केवळ एका दिवसाच्या किंवा कार्यक्रमांपुरत्या सन्मानाची गरज नसून त्यांच्या मूळ ओळखीचा, अस्मितेचा, इतिहासाचा आणि सांस्कृतिक अस्तित्वाचा योग्य आणि परिपूर्ण आदर शासन व प्रशासनाकडून झाला पाहिजे, असेही गेडाम यांनी म्हटले आहे.

​आदिवासींच्या नावाखाली कार्यक्रम आयोजित करताना त्यांच्या भावना आणि अस्मितेचा पुरेपूर विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ऐतिहासिक ओळखीचा सन्मान राखत भविष्यात सर्वत्र ‘जागतिक आदिवासी गौरव दिवस’ हाच अधिकृत शब्दप्रयोग वापरण्यात यावा, तसेच आदिवासी समाजाच्या या भावना शासन आणि संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने घ्याव्यात, असे आवाहन पवन गेडाम यांनी या प्रसंगी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button