जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली : १८ नोव्हेंबरला ‘भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सवा’चे भव्य आयोजन

सतीशदादा पेंदाम करणार मार्गदर्शन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १७ नोव्हेंबर २०२६)

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी एकता युवा समिती, गडचिरोली यांच्या वतीने चामोर्शी रोडवरील गोकुळनगर येथील क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा चौक येथे हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

भगवान बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचा, त्यागाचा आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या संघर्षाचा जागर करण्यासाठी या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे.

दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रमुख मार्गदर्शक व मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सतीशदादा पेंदाम राष्ट्रीय अध्यक्ष – बिरसा ब्रिगेड तसेच प्रा. डॉ. दिलीप चौधरी प्रदेशअध्यक्ष वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद हे उपस्थित राहून भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांवर, आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासावर मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तेलंगणा राज्यातील आदिवासी सुप्रसिद्ध गायक रेला रवी मेश्राम यांच्या ऑर्केस्ट्राद्वारे आदिवासी गीत-संगीताचा रंगारंग कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या महोत्सवात आदिवासी समाजबांधवांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आदिवासी एकता युवा समिती गडचिरोलीच्या वतीने करण्यात आले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button