जाहिरात
आपला जिल्हा

गणेशपूर (सिर्सी) येथून भव्य ‘महाराष्ट्र दर्शन व पंढरपूर वारी’ला उत्साहात प्रारंभ

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १४ नोव्हेंबर २०२६)

​”पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम…” या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या निनादात गडचिरोली जिल्ह्यातील भाविकांची पावले आज पांडुरंगाच्या भेटीसाठी वळली आहेत. गणेशपूर (सिर्सी), गडचिरोली आणि वाढोणा येथील वारकऱ्यांच्या भव्य ‘महाराष्ट्र दर्शन व पंढरपूर वारी’ला आज, शनिवार दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री विठ्ठल-रुक्माई मंदिर, गणेशपूर (सिर्सी) येथून मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात प्रारंभ झाला आहे. ही वारी दि. १४ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२६ या दहा दिवसांच्या कालावधीत संपन्न होणार आहे.

​ महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्राचे घडणार दर्शन 

या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पंढरपूरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे, ज्योतिर्लिंगे आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे दर्शन वारकऱ्यांना घडणार आहे. या प्रवासात सर्वप्रथम शिवनी (जि. यवतमाळ) येथील वारकरी बांधवांची सदिच्छा भेट आणि मुक्काम होणार आहे. त्यानंतर या वारीचा पुढील प्रवास पुढीलप्रमाणे असेल:
​शक्तिपीठे व देवी दर्शन: माहूरगड (रेणुका माता), कोल्हापूर (महालक्ष्मी) आणि वणीची सप्तशृंगी गड,​ज्योतिर्लिंग दर्शन: औंढा नागनाथ, परळी वैजनाथ आणि नाशिक येथील त्र्यंबकेश्वर.संतांच्या भूमीत मुक्काम: अक्कलकोट (श्री स्वामी समर्थ), पंढरपूर (श्री विठ्ठल-रुक्माई), शिर्डी (श्री साईबाबा) आणि शेगाव (श्री संत गजानन महाराज).

​आयोजकांचे मोलाचे सहकार्य
!!
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भाविकांना एकाच यात्रेत संपूर्ण महाराष्ट्राचे आध्यात्मिक दर्शन घडावे, या उदात्त हेतूने या वारीचे नियोजन करण्यात आले आहे. या भव्य वारीचे आयोजन श्री मुरारीजी वाघाडे महाराज (गणेशपूर – सिर्सी), श्री अनुरथ निलेकार महाराज (गडचिरोली) आणि श्री बाळकृष्ण चौधरी महाराज (वाढोणा) यांच्या विशेष सहकार्याने व मार्गदर्शनाखाली होत आहे.

​प्रस्थानाच्या प्रसंगी गणेशपूर (सिर्सी), वाढोणा आणि परिसरातील ग्रामस्थांनी वारकऱ्यांना पुष्पहार घालून व फटाक्यांच्या आतषबाजीत भावपूर्ण निरोप दिला. यावेळी संपूर्ण गाव भक्तीरसात न्हाऊन निघाले होते. दहा दिवसांच्या या आध्यात्मिक प्रवासानंतर दि. २३ नोव्हेंबर रोजी ही वारी सुखरूप परतणार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button