जाहिरात
ताज्या घडामोडी

बी. प्रभाकरन यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स २०२६’ पुरस्कार; सन्मान गडचिरोलीच्या जनतेला समर्पित

Spread the love

लोकशाही न्युज,​मुंबई, दि. २२ नोव्हेंबर २०२६:

गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक विकासातील उल्लेखनीय योगदानाबद्दल लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स २०२६’ ने सन्मानित करण्यात आले.

मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे दिव्याज फाउंडेशनतर्फे आयोजित सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सिने कलाकार जॅकी सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, शाहरुख खान, रणवीर सिंह, अक्षय कुमार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
​हा पुरस्कार गडचिरोलीच्या जनतेला समर्पित करताना बी. प्रभाकरन म्हणाले, “स्थानिक समुदायाचा विश्वास हीच आमची प्रेरणा आहे. औद्योगिक विकासासोबतच स्थानिक युवकांना रोजगार, उत्तम आरोग्य आणि शिक्षण मिळावे, हेच आमचे ध्येय आहे.” याप्रसंगी त्यांनी आई-वडील, भाऊ कार्तिकेयन तसेच बबलूलाल अग्रवाल, मुकेश गुप्ता आणि राजेश गुप्ता यांचे आभार मानले.

​लॉयड्स मेटल्सचे प्रमुख कार्य
!!
​रोजगार व गुंतवणूक: १७,५०० हून अधिक जणांना रोजगार (३,००० महिलांचा समावेश) आणि एकात्मिक पोलाद प्रकल्पासाठी २५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक.
​कौशल्य विकास: बोडली येथील अकादमीतून १,००० हून अधिक युवकांना प्रशिक्षण आणि १०० टक्के प्लेसमेंट.
​आरोग्य व शिक्षण: २.७६ लाखांहून अधिक नागरिकांना मोफत आरोग्य सेवा. २,५०० विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व ३० हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.
​पुनर्वसन व सक्षमीकरण: ३५० हून अधिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ११० टक्क्यांची वाढ, महिलांसाठी गारमेंट सेंटर आणि ९६ हून अधिक आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करून त्यांना रोजगार.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button