जाहिरात
ब्रेकिंग न्युज

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

कॉक्रोज जनता पार्टीच्या लढ्याला यश

Spread the love

लोकशाही न्युज, (दि.२५जुलै)

नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून गेल्या एका महिन्यापासून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टी कडून करण्यात आली होती.याच मुद्यावरून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील बेमुदत उपोषणाला बसले होते.

२३ जुलै रोजी सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण सोडलं.सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा अभिजीत दीपके यांनी केली होती.कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत होता. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थी ठाम होते.

कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला विरोधकांनी देखील पाठिंबा देत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या सर्व घडामोडीनंतर आता दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आज (२५ जुलै) राजीनामा दिला आहे.गेल्या एका महिन्यांपासून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर मोठं यश आलं आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button