गडचिरोली : गिजर च्या करंट ने ३० वर्षीय युवकाचा मृत्यू

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ८ जुलै)
गडचिरोली शहरात एक अत्यंत दुर्देवी व हृदयदायक घटना घटना घडलेली आहे. घरातील गिजरचा दुरुस्ती दरम्यान करंट लागल्याने एका ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झालेला आहे.मृत्यू झालेल्या युवकाचे नाव चिकू उर्फ अरविंद भोपये वय ३० वर्ष रा. मुरमाळी आहे.
शहरात इलेक्ट्रिक चे काम करायचा कामाचं भक्कम अनुभव होता. कामात खूप हुशार होता. शहरात त्याची मोठ्या प्रमाणात ओळख होती. लोकप्रिय होता. कधी कुणाला कोणत्याच कामासाठी नाही म्हणायचं नाही. आज सकाळी नेहमी प्रमाणे तो इलेक्ट्रिक च्या कामासाठी निघाला मिळेल ते काम करायचा आशीर्वाद नगर येथील प्रदीप इंदूरकर यांच्या घरी गिजर दुरुस्तीच्या कामासाठी गेला आणि गिझर दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक त्याला जोरदार शॉक लागला.ही घटना साधारणतः ३ वाजे दरम्यान झालेली आहे.
चिकू फक्त ३० वर्षाचा होता. त्याच्या मृत्यू पश्चात आई-वडील व दोन विवाहित भावंडे आहेत. मृतक हा अविवाहित होता. त्याच मूळ गाव मूरमाळी आहे. त्याच्या पार्थिवावर उद्या सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती त्याच्या परिवाराकडून देण्यात आली आहे.
