जाहिरात
ब्रेकिंग न्युज

गडचिरोली-चामोर्शी महामार्गावरील पोहार नदीजवळ दोन ट्रक पलटले

जीवितहानी टळली

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली,(दि. २ जुलै):

जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळे गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील कुरूडजवळील पोहार नदीच्या पुलाच्या पोच मार्गाचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला असून आज दोन ट्रक नदीजवळ पोच मार्गावर पलटल्याची घटना घडली आहे.सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

गडचिरोली-चामोर्शी महामार्गावरील कुरूड (पोहार) व शिवणी (पोटफोडी) नदीजवळ पोच मार्गाचे काम रखडल्यामुळे सर्व अवजड वाहतूक जुन्या पुलावरून सुरू आहे. या पुलांना अनेक ठिकाणी भेगा पडल्याचे दिसून येत असून, सातत्याने होत असलेल्या जड वाहतुकीमुळे पुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले आहे. मात्र अद्यापही पोच मार्गाचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पोहार व पोटफोडी नदीवरील पुलाच्या पोच मार्गाचे अपूर्ण काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, तसेच जुन्या पुलांची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती अथवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button