जाहिरात
राजकीय

माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि. १ जुलै) :

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस आज ०१ जुलै रोजी (बुधवार) ला अत्यंत साधेपणाने, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

सकाळी चामोर्शी रोडवरील जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यानंतर गडचिरोलीचे आराध्य दैवत सेमाना देवस्थान येथे दर्शन व पूजा-अर्चना करून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

यानंतर चामोर्शी रोडवरील मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांची भेट घेण्यात आली. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच त्यांच्यासोबत संवाद साधून वाढदिवसाचा आनंद वाटून घेण्यात आला.

शहरातील गांधी चौक येथील महिला व बाल रुग्णालयात ‘एक घास माणुसकीचा’ या उपक्रमांतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनाचे वाटप करण्यात आले. रुग्णांना फळांचे वितरण करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली.

वाढदिवसानिमित्त डॉ. अशोक नेते यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाखांचा धनादेश देऊन सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधोरेखित केली. समाजहितासाठी योगदान देण्याची त्यांची ही भावना उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

सायंकाळी गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील गोविंदपूर येथील विला अर्बन फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट येथे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवर, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था व नागरिकांनी उपस्थित राहून डॉ. अशोक नेते यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व निरंतर जनसेवेच्या शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button