जाहिरात
गडचिरोली

डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे २ वर्षीय बालकाचा महिला रुग्णालयात मृत्यु

डॉक्टरवर गुन्हा दाखल करुन निलबिंत करा पालकांची मागणी.

Spread the love

गडचिरोली (१३ जुलै)

डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे एका २ वर्षीय बालकाचा गडचिरोलीच्या महीला रुग्णालयात मृत्यू झाल्यामुळे या डॉक्टरवर गुन्हा दाखल करून निलंबीत करावे अशी मागणी मृतकाचे वडील आशिष प्रधाने,व आजोबा भंजदेव यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्हयातील सावली येथिल पार्थ आशिष प्रधाने या २ वर्षीय बालकाला त्याच्या कुटुंबीयांनी पहाटे ४:०० वाजता उपचारासाठी गडचिरोली येथिल महिला रुग्णालयात दाखल केले. परंतु यावेळी एकही डॉक्टर हजर नव्हते. डॉक्टर तारकेश्वर उईके यांची नेमणूक असतांना ते ड्युटीवर हजर नव्हते. वारंवार फोन करुनही डॉक्टर आले नाही.
डॉक्टर उईके आज सकाळी ७:४५ वाजता आले. तोपर्यंत त्या बालकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मृतकांच्या कुटुंबीयांनी जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली व पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली त्यानूसार चौकशी सुरु करून मृतकाचे शव पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले..

सदर प्रकरणाबाबत खासदार अशोक नेते यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ महिला रुग्णालय गाठून रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. वेळीच संबधित डॉक्टर यांचेवर कारवाई करावी असे आदेश रुग्णालय प्रशासनाला दिले.

 

डॉ अनिल रुडे
जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली
👇👇
तज्ञ डॉक्टरांकडून मुलाच्या बॉडीचे पोस्टमार्टम झालेले आहे. सदर तक्रार गडचिरोली पोलिस स्टेशनला दिलेली असल्याने चौकशी होईल.
सात डॉक्टराची समिती नेमून चौकशी करण्यात येईल
व दोषींवर कारवाई करण्यात येईल.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button