जाहिरात
ब्रेकिंग न्युज

अहमदाबाद येथे विमान दुर्घटना, १५० जणांचा मृत्यू

विमानात २४२ प्रवासी

Spread the love

लोकशाही न्युज, अहमदाबाद (दि. १२ जून)

आज दुपारी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक दुर्घटना अहमदाबाद येथे घडली. एअर इंडिया कंपनीचे लंडन गॅटविककडे जाणारे विमान (AI-१७१) अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच शहराच्या रहिवासी भागात कोसळले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.विमानात २३२ प्रवासी ज्यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटन, ७ पोर्तुगाल, १ कॅनडा आणि १२ विमान कर्मचारी होते.१५० प्रवासी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

एअर इंडियाच्या AI- १७१ फ्लाइटने दुपारी १:३५ वाजता सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने उड्डाण घेतले. मात्र, उड्डाणानंतर केवळ ५ मिनिटांतच विमानाचे रडारवरील संपर्क तुटले. काही क्षणांतच, मगंहानी नगर परिसरात जोरदार आवाज आणि धुराचे लोट दिसून आले.

विमान दुर्घटनेत गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री
!!
अहमदाबाद वरून लंदन जाणाऱ्या विमानात गुजरात राज्याचे पूर्व मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा होते.

अपघातस्थळी मदतकार्य
!!
घटनेनंतर लगेचच फायर ब्रिगेड, NDRF, पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरात आग पसरल्याने १० घरे, २ दुकाने पूर्णतः जळून खाक झाली. सुमारे ३० पेक्षा अधिक जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य सुरू असताना, अनेक मृतदेहांचे अवशेष आढळून आले आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button