जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप

अहेरी-नागेपल्ली परिसरातही सौम्य धक्के

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि. ३ सप्टेंबर २०२६) :

गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असून त्याचे केंद्र गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याचे प्राथमिक माहितीत दर्शविण्यात आले आहे.

अहेरी तालुक्यातील अहेरी व नागेपल्ली परिसरातही हे धक्के जाणवल्याची माहिती अहेरी तहसील प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती प्राप्त झालेली नाही.

नागरिकांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे घाबरून जाऊ नये. शांतता राखून आवश्यक ती दक्षता बाळगावी. तसेच भूकंपासंदर्भातील अफवा अथवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button