गडचिरोली : सोन्या-चांदीच्या दागिण्यांची जबरी चोरी करणाऱ्या ३ आरोपिना पोलीसांनी केली अटक

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२ सप्टेंबर २०२६)
गडचिरोली ते चामोर्शी रोडवरील जंगल सोसायटी ऑफीस जवळ ३१ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता सुरेश भोजापुरे नामक सोने-चांदी व्यापारी याच्या चेहऱ्यावर लाल रंगाचा पावडर फेकून सोन्या-चांदीच्या दागिण्यांची जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात आरोपींना गडचिरोली पोलीसांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासांच्या आत दि.२ सप्टेंबर रोजी ३ आरोपींना अटक केली आहे. व चवथा आरोपी फरार झाला आहे.
सदर घटनेच्या अनुषंगाने फिर्यादीने दिलेल्या माहितीवरुन पोलीस स्टेशन गडचिरोली येथे काल दिनांक ०१/०९/२०२६ रोजी अप. क्र. १२३१/२०२६ कलम ३०९ (५), ६२ भान्यासं २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गडचिरोली शहरातून तीन संशयीत आरोपी नाव १) विशाल घनश्याम देशमुख, वय ३६ वर्षे, रा. रामनगर २) राकेश विजय गिरसावळे वय ३५ वर्षे, रा. कन्नमवार नगर, ३) शहबाज सलाम शेख, वय ३१ वर्षे, रा. विवेकानंद नगर,
यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
यादरम्यान पोलीसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, आरोपींनी अन्य आरोपी क्र. ०४) सोनु खांडेकर, वय २४ वर्षे, रा. विवेकानंद नगर गडचिरोली याचा देखील गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगितले. यावरुन गडचिरोली पोलीसांनी सर्व तीनही आरोपीस आज दिनांक ०२ सप्टेंबर २०२६ रोजी अटक करुन आरोपीतांना न्यायालय समक्ष हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी सोनु खांडेकर याचा शोध घेणे सुरु असून गुन्ह्याचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.
