जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली : माजी नक्षली नेता भूपती च्या निवडीवरून जिल्हा महाग्रामसभा व आदिवासी संघटना आक्रमक

गोंडवाना विद्यापीठात दिलेली समन्वयक नियुक्ती तात्काळ रद्द करा अन्यथा आंदोलन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.७ सप्टेंबर)

४५० पोलीस जवानांचा हत्यारा तसेच नक्षल चळवळीचा प्रमुख मल्लोजुला वेणूगोपालराव उर्फ भूपती यांची गोंडवाना विद्यापीठाने ‘एकल’ उपक्रमात समन्वयक म्हणुन केलेली निवड तात्काळ रद्द करावी अशी मागणी आज झालेल्या (दि.७ सप्टेंबर) ला कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

भूपती यांची निवड तात्काळ रद्द करावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली व पोलीस अधीक्षक गडचिरोली यांना दिले आहे.

अन्यथा आंदोलन
!!
मल्लोजुला वेणूगोपालराव उर्फ भूपती यांची गोंडवाना विद्यापीठाने ‘एकल’ उपक्रमात समन्वयक म्हणुन केलेली निवड तात्काळ रद्द करावी, निवड रद्द झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटना एकत्र येऊन मोठा आंदोलन उभारणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आज झालेल्या पत्रकार परिषदेला नंदू नरोटे जिल्हा महा ग्रामसभा सल्लागार, नितीन पदा अध्यक्ष जिल्हा महा ग्रामसभा,चिंना महाका संयुक्त ग्रामसभा समिती भामरागड सचिव,सुरेश पुंगाटी, सीताराम मडावी,
इंदरशाह मडावी,भारती इष्टाम,शामराव सडमेक,प्रविण वड्डे, लालसू आत्राम,रामय्या सडनेक,सहाना मडावी,बुकलू लेकामी,कुंदा किरंगे महा ग्रामसभा जिल्हा संघटना कार्याध्यक्ष यांचे सह अनेक हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button