गडचिरोली: १५ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ९ सप्टेंबर २०२६)
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. अवघ्या १५ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतक झालेली महिला प्रसूती साठी ८ सप्टेंबर ला महिला व बाल रुग्णालयात भरती झाली होती.धानोरा तालुक्यातील दिव्या रामसिंग उईके वय-३१ वर्ष या महिलेचा प्रसूतीदरम्यान बाळासह मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
यापूर्वी चामोर्शी तालुक्यातील जिजा हंसराज सातर वय-२७ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कोजबी येथील नाजुका दिवाकर राऊत वय-२३ यांचा गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. या घटनांची चौकशी सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असतानाच पुन्हा माता-बाल मृत्यूची घटना घडणे हे अत्यंत गंभीर आहे.
आता केवळ चौकशी नको, ठोस कारवाई हवी
!!
आजाद समाज पक्षाच्या वतीने प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात येत आहे की, माता-बाल मृत्यूच्या या प्रकरणात तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर आजाद समाज पक्ष रुग्णालय प्रशासनाच्या दरवाज्यातच आंदोलन छेडेल.असा इशारा देण्यात आला आहे.
