गडचिरोली : नगरसेविका शिल्पा हेमके (गव्हारे) यांच्या अनाधिकृत बांधकाम प्रकरणी तात्काळ सदस्यतत्व रद्द करून फौजदारी गुन्हा दाखल करा
बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टीची मागणी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.९ सप्टेंबर२०२६)
गडचिरोली सर्वे क्र. ११/१ क भूखंड क्रमांक ६६ वरील अनाधिकृत बांधकामाची चौकशी करून प्रत्यक्ष सहभागी असलेले भाजपा नगरसेविका तथा उपसभापती महिला बालकल्याण शिल्पा अंकित हेमके (गव्हारे) यांचे सभासदत्व तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी चे जिल्हाधक्ष मिलिंद बांबोळे यांनी आज स्थानिक विश्राम गृह येथे (दि. ९ सप्टेंबर ) ला झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. त्या संबंधित निवेदन सुद्धा जिल्हाधिकारी गडचिरोली यांना सादर करण्यात आले आहे.आज झालेल्या पत्रकार परिषदेला अरविंद वाळके जिल्हा महासचिव, विलास कुंभारे संघटक हे उपस्थित होते.

(निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देताना बीआरएसपी चे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी)
जिल्हा सह आयुक्त (न.प. प्रशासन) जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांचे पत्र क्रमांक / कार्या/१०(१)/न.पा.प्र./का.वी./५६२/२०२६ दिनांक २४/०८/२०२६ रोजी मुख्याधिकारी नगर परिषद गडचिरोली यांना दिलेल्या पत्रात मौजा गडचिरोली सर्वे क्र. ११/१ क भूखंड क्रमांक ६६ वरील अनाधिकृत बांधकामाची चौकशी करून प्रत्यक्ष सहभागी असलेले सत्ताधारी पक्ष भाजपा नगरसेविका तथा उपसभापती महिला बालकल्याण शिल्पा अंकित हेमके (शिल्पा उध्दवराव गव्हारे) व त्यांचे पती अंकित हेमके यांच्या सदर भूखंडावर प्रत्यक्ष सहभाग असल्याचे सातबारा वरून निदर्शनास येत असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिल्पा अंकित हेमके यांनी नगर परिषद गडचिरोली हद्दीत मौजा गडचिरोली येथे सर्वे क्रमांक ११/१ क या खुल्या जागेवर रहिवासी वापराकरीता अकृषक प्लॉट काढून प्लॉटची विक्री केलेली आहे सदर भूखंड विक्री करत असतांना महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायत आणि औद्योगिक टाऊन शिफ्ट अधिनियम १९६५ च्या कलम ४४ मधील तरतुदीनुसार सदर रहिवासी वापर जागेवर भूमिगत नाली गटार, रस्ते, विद्युत पथदिवे खुल्या जागेवर सौदर्याकरण व इतर बाबी करणे अनिवार्य आहे.
सदर जागेचा नियमानुसार पुर्ण विकास झाल्यानंतर सदर प्लॉटचे गहाणखत सोडविण्यात येतो परंतु सर्वे क्रमांक ११/१ भूखंड क्रमांक ६६ हे. भूखंड नगर परिषदकडे गहाण राखीव असून सुध्दा सदर भूखंडावर पक्या स्वरूपात अनाधिकृत बांधकाम करण्यात आलेला आहे. सदर बांधकाम करत असतांना त्या भूखंडावर नगर परिषद हक्क असतात सुध्दा बांधकाम परवानगी अथवा मंजुरी नकाशा उपलब्ध नसतांना सुध्दा बेकायदेशीर व अनाधिकृत पक्का बांधकाम करण्यात आले आहे. भूखंड क्रमांक ६६ नगर परिषद गडचिरोलीकडे गहाण असल्याची नोंद आहे. सर्वे क्रमांक ११/१/क या खुल्या जागेवर लेआऊट टाकून भूखंड विक्री करण्यात आलेले नागरिकांची दिशाभूल करण्याचा काम करण्यात आला आहे. सदर नगरसेविका शिल्पा अंकित हेमके (शिल्पा उध्दवराव गव्हारे) यांचे कडून नगर परिषद कडे गहान असलेल्या भूखंडावर विना परवानगी अनाधिकृत पक्का स्वरूपाचे बांधकाम केल्याप्रकरणी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून सदस्यत्व रद्द करून अपात्रतेची कारवाई करण्यात यावी.
तरी सदर प्रकरणी तक्रार नगर परिषद येथे दिली होती पण आठ दिवसाचा कालावधी उलटून सुध्दा वरीष्ठ अधिकारी नगर परिषद प्रशासन मुख्याधिकारी यांचे कडून सदर कारवाई करण्यात आलेली नाही.
तरी कारवाही न झाल्यास आंदोलन करण्यांत येईल अशी भुमिका बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी ने या पत्रकार परिषदेतून दिली आहे.
शिल्पा गव्हारे
नगरसेविका (प्रभाग क्र. ८)
तथा उपसभापती महिला बालकल्याण नगर परिषद गडचिरोली
!!
उद्याला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सदर बाबीचा खुलासा करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया लोकशाही न्युज ला दिली आहे.
