गडचिरोली : निधी मिळूनही पाणी व स्वच्छता सल्लागार (WASH PMU) कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्याने प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह
लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.११ सप्टेंबर २०२६)
पाणी पुरवठा व स्वच्छता अभियानांतर्गत पाणी व स्वच्छता सल्लागार (WASH PMU) बाह्य स्रोत (Outsourcing) संस्थेद्वारे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यात गंभीर बनला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सर्व बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अदा करण्यात आले असताना, केवळ गडचिरोली जिल्ह्यातील WASH PMU कर्मचाऱ्यांना गेल्या ९ महिन्यांपासून वेतनापासून वंचित राहावे लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून मंजूर होऊन आणि प्रशासनाकडे वर्ग होऊन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. तरीदेखील कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा झालेले नाही.
९ महिन्यांपासून वेतन नाही, प्रशासनाकडून थेट सेवेतून मुक्ती
!!
गेल्या ९ महिन्यांपासून थकीत असलेल्या वेतनामुळे कर्मचाऱ्यांवर तीव्र आर्थिक संकट ओढवले आहे. या थकीत वेतनाच्या मागणीवरून आणि प्रशासकीय विलंबाच्या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांना थेट कार्यमुक्त करण्यात आल्याचे समोर आले आहे.
प्रशासनासमोरील प्रमुख प्रश्न
!!
राज्यभरात इतर सर्व जिल्ह्यांत वेतन दिले गेले असताना गडचिरोलीतील कर्मचाऱ्यांचा निधी का रोखला गेला? निधी उपलब्ध असतानाही गेल्या एका महिन्यात वितरण का केले गेले नाही? कार्यमुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे उर्वरित ९ महिन्यांचे थकीत वेतन कधी दिले जाणार? संबंधित बाह्य स्रोत संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्या या कारभारामुळे बाधित कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून थकीत वेतन तात्काळ अदा करण्याची मागणी केली जात आहे.
सुहास गाडे (सी ई ओ )
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद गडचिरोली
!!
प्रतिक्रियेसाठी फोन लावला असता प्रतिसाद दिला नाही.
