
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ८ मे)
गडचिरोली शहरातील ‘संताजी भवन’ आरमोरी रोड गडचिरोली येथे संताजी सोशल मंडळ गडचिरोलीतर्फे रविवार ८ जूनला तेली समाजातील स्टेट व सिबिएससीचे मिळून एकूण ६५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता १० वी ८०% तथा १२ वी ७०% किंवा त्यापेक्षा अधिक, तसेच विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.यांचे सोबतच समाजातील ज्येष्ठ नागरिक यांचा सुद्धा शिल्ड,शाल,श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.संताजी सोशल मंडळाच्या वतीने दरवर्षी पुढाकार घेऊन गुणवंताचा सत्कार केला जातो ही बाब विशेष.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कांमडी अध्यक्ष संताजी सोशल मंडळ गडचिरोली,कार्यक्रमाचे उद्घाटक मा. प्रमोद तरारे अध्यक्ष महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण मुंबई तथा माजी धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य प्रमुख, अतिथी व मार्गदर्शक डॉ. रामचंद्र वासेकर सहाय्यक प्राध्यापक महात्मा गांधी महाविद्यालय सावली, प्रमुख अतिथी भाग्यवानजी खोब्रागडे अध्यक्ष किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरी, नरेंद्र तरारे नागपूर, विठ्ठलराव कोठारे सचिव संताजी मंडळ, प्रभाकर वासेकर अध्यक्ष संताजी समिती प्रतिष्ठान, प्रमोद पिपरे अध्यक्ष प्रांतिक तैलीक महासंघ,सुरेश भांडेकर अध्यक्ष विदर्भ तेली महासंघ, गोपीनाथ चांदेवार,भास्करठाकरे उपस्थित होते.
सर्वप्रथम संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वर्गीय श्रावणी तरारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ बीपीएल मधील तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले तसेच भास्करराव ठाकरे व सुरेश भांडेकर यांच्यातर्फे सहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी ११०० रुपये रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. तसेच दहावी व बारावी नवोदय व स्कॉलरशिप व एमबीबीएस येथील गुणवत्ता प्राप्त ६५ विद्यार्थ्यांना शिल्ड प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच ज्येष्ठ नागरिकांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
मार्गदर्शक डॉ.रामचंद्र वासेकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी ध्येय समोर ठेवून आपली आवड लक्षात घेऊन आपले करिअर करावे उच्चशिक्षित होऊन नोकरी करीत असतानाच समाजाची सुद्धा सेवा करावी, विद्यार्थ्यांनी अनेक चांगल्या व्यक्तीचे प्रेरणा देऊन आपण उच्चशिक्षित व्हावे असे म्हणाले.
समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
!!
तेली समाजातील ज्येष्ठ नागरीक म्हणुन वत्सला पांडुरंग भांडेकर गडचिरोली,
गोपीनाथ चांदेवार गडचिरोली,सुखदेव बारसागडे गडचिरोली, आनंदराव कांबळे गडचिरोली, बाळकृष्ण बाळेकरमकर गडचिरोली, सेवानिवृत्त प्रा. विठ्ठलराव निकुरे मुलचेरा यांचा शिल्ड, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देवानंद कांमडी तर सूत्रसंचालन विठ्ठलराव कोठारे तर आभार सुधाकर लाकडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संताजी मंडळाचे सदस्य तसेच संताजी महिला मंडळाचे सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला बहुसंख्य समाज बांधव गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.
