जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली : शहरातील अनेक आधार केंद्र बंद, केवळ १ चालू

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १३ जून)

शासनाने नागरिकांचे काम सोयीने व्हावे याकरिता त्यांना जागोजागी आधारकेंद्र देऊन सोय करण्यात आली. पण गडचिरोली शहरात जनतेच्या सोयीसाठी अनेक आधार केंद्र सेंटर मंजूर करून दिलीत. पण आज केवळ शहरात पंचायत समिती परिसरातील एकच आधार केंद्र सुरु असल्याने नागरिकांना नविन आधार कार्ड बनविणे तसेच आधार कार्डचे नूतनिकरण करणे आदी कामासाठी नाहक त्रास सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे.

सुरु असलेल्या आधार केंद्रावर हजारो नागरिकांची गर्दी जमत असल्याने अनेकांना आल्या पावली माघारी जावे लागते.ज्यात लहान मुलांपासून तर वयोवृद्ध आजोबांपर्यंत अनेक जण असतात.लहानच्या कामासाठी अनेक हेलपाटे मारूनही काम होत नाही.

गडचिरोली शहरातील व परिसरातील लोकसंख्येचा विचार करता अनेक आधार केंद्र सुरु करावीत अशी मागणी आधार कार्ड काढण्याकरिता आलेल्या नागरिकांनी लोकशाही न्युज प्रतिनिधी जवळ बोलून दाखविली.

नगर परिषदेतील आधार केंद्र १ महिन्यापासून बंद
!!
लोकशाही न्युज प्रतिनिधीनी नगर परिषद गडचिरोली येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता सदर केंद्रावरील कॉम्पुटर ऑपरेटर केंद्र उघडून बसून आहेत. पण कामासाठी आलेल्या नागरिकांना लिंक नाही असेच उत्तर देत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button