जाहिरात
गडचिरोली पोलीस

गृहमंत्री अमित शाह च्या दौऱ्यापूर्वी पर्लकोटा नदीवर पेरलेले स्फोटक उध्वस्त करण्यात पोलिसांना आले यश

Spread the love

लोकशाही न्युज, भामरागड (दि,१६ नोव्हेंबर)

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्याप पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके (I.E.D)पेरून ठेऊन मोठा घात करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव पोलिसांनी आज उध्वस्त केला.

( नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले बॉम्बस्फोट अशा पद्धतीने उध्वस्त केले)

पोलीस पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या विश्वसनिय गोपनिय माहितीच्या आधारे सदर स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करणेकामी गडचिरोलीहून एक (BDDS) बीडीडीएस टीम हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठविण्यात आली. गडचिरोली पोलीस, सीआरपीएफ कंपनी आणि बीएसएफ कंपनीच्या एकत्रित पथकाने सदर परिसरात शोध अभियान सुरू केले.शोध अभियाना दरम्यान पथकांना भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर दोन स्फोटके (IED)सापडले. बीडीडीएस पथक स्फोटके निष्क्रिय करण्याची तयारी करत असताना एका स्फोटकाचा (IED)स्फोट झाला, तर दुसरे स्फोटक (IED) बीडीडीएस पथकाने घटनास्थ्ळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट केला.

सुरक्षा दलातील कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही, तसेच सदर परिसरात अजून शोध अभियान सुरू आहे. गडचिरोली पोलीसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात  यश आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button