जाहिरात
विधानसभा गडचिरोली

गडचिरोली: १७ नोव्हेंबर ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा

डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ सभा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१६ नोव्हेंबर)

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा-६८ क्षेत्राचे भाजपा- महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची जाहीर सभा गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालय च्या प्रांगणात धानोरा रोड येथे दुपारी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

देशाचे सर्वांत यशस्वी आणि दमदार गृहमंत्री म्हणून अमित शाह यांची ओळख आहे. देशातील गुन्हेगारांवर वचक मिळवून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अमित शाह यांना यश आलं आहे. गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालय च्या प्रांगणात धानोरा रोड येथे दुपारी ११.०० वाजता अमित शाह गडचिरोली च्या नागरिकांशी संवाद साधतील.

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या आयोजीत जाहीर सभेला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button