जाहिरात
विधानसभा गडचिरोली

गडचिरोली : भाजपा चे डॉ.मिलिंद नरोटे विजयी

१५ हजार ५०५ मतांनी काँग्रेस चे मनोहर पोरेटी पराभूत

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२३ नोव्हेंबर)

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा-६८ क्षेत्राचे भाजपा- महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांनी काँग्रेस-महा विकास आघाडी चे उमेदवार मनोहर पोरेटी यांचा १५ हजार ५०५ मतांनी पराभव करत दणदणीत विजय खेचून आणला. भाजपाचे मिलिंद नरोटे यांना १ लाख १६ हजार ५४० मते मिळाली तर पराभूत काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांना१ लाख १ हजार ३५ मते मिळाली.

२३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी आयटीआय चौक परिसरात कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सकाळी ८ वाजता पासून सुरूवात झाली. टपाली मतमोजणी पासून व पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे मनोहर पाटील पोरेटी यांनी दोन ते तीन हजाराची मतांची आघाडी घेतलेली दिसून येत होती. पण सतराव्या, अठराव्या फेरीनंतर भाजपाचे उमेदवार मिलिंद नरोटे यांनी विजय मताधिक्याची आघाडी घेत विजयश्री खेचून आणण्यात यश मिळवले. विकासाचा वादा-मिलिंद दादा म्हणून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

भाजपाचे डॉ. मिलिंद नरोटे विजय होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी आपल्या पेंडालमध्ये ढोल ताशांचा गजर व फटाके व गुलाल उधळून आतिषबाजी केली. तसेच पेंढाल मध्ये पेढे वाटून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले.त्यानंतर गडचिरोली शहरातून डॉ. मिलिंद नरोटे यांची विजयश्री रॅली काढण्यात आली. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विजयी रॅलीत भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहाने नाचत होते.

चामोर्शी च किंगमेकर
¶¶¶
गडचिरोली विधानसभेतून निवडणुकीचा विजयाचा मार्ग हा चामोर्शीतून जातो असे म्हटले जाते. अनेकदा हे सिद्ध झाले भाजपा चे डॉ. मिलिंद नरोटे यांनी सुद्धा चामोर्शीतून प्रचंड मताधिक्य घेत आपला विजयश्री खेचून आणला आणि चामोर्शीच किंगमेकर आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. डॉ. मिलिंद नरोटे यांचे गाव सुद्धा चामोर्शी तालुक्यातच आहे. त्यामुळे त्यांना त्या तालुक्यातून मताधिक्य मिळणे हे अगदी स्वभाविकच आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button