गडचिरोली : कोण होणार गडचिरोली मतदारसंघाचा आमदार
काँग्रेस चे मनोहर पोरेटी की भाजपा चे डॉ.मिलिंद नरोटे चर्चेला उथाण..

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२२ नोव्हेंबर)
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा-६८ क्षेत्राचे भाजपा- महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे व काँग्रेस-महा विकास आघाडी चे उमेदवार मनोहर पोरेटी यांच्यात दुहेरी लढत पहावयास मिळाली. गडचिरोली विधानसभा मतदारसंघातुन काँग्रेस व भाजपा मध्ये विजयी उमेदवाराला विधानसभेवर जाण्याची संधी मिळणार आहे.
२० नोव्हेंबर ला झालेल्या मतदानाच्या दिवशी गडचिरोली मतदारसंघात एकूण १ लक्ष ५४ हजार ६१० पुरुष मतदार , १ लाख ५२ हजार ६१० महिला व ३ तृतीयपंथी असे एकूण ३ लाख ७ हजार २२३ मतदार होते. यातील १ लाख १६ हजार ७०४ पुरुष मतदार, १ लाख १३ हजार ४६९ स्त्री मतदार तर १ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ३० हजार १७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतांची टक्केवारी वाढल्याने काँग्रेस -महाविकास आघाडी व भाजपा- महायुती यांच्या दोन्ही पक्षाकडून पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून विजय आपलाच असल्याचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. उद्या दि, २३ नोव्हेंबर शुक्रवारला गडचिरोली मतदार संघाचा आमदार कोण मतमोजणीतुन दिसणार आहे.
