गडचिरोली : काँग्रेस उमेदवार मनोहर पोरेटी यांना विजयी करण्याकरता कार्यकर्त्यांनी कंबर कसली

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१७ नोव्हेंबर)
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा-६८ क्षेत्राचे काँग्रेस- महाविकास आघाडी चे उमेदवार मनोहर पा. पोरेटी यांना पहिल्यांदा आमदार करण्याकरता काँग्रेस-महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.कार्यकर्ते आपल्या नेत्याला आमदार करण्याकरता त्यांच्या प्रचारार्थ अहोरात्र परिश्रम घेत असून गावं गाव पिंजून काढत आहेत.
काँग्रेस – महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर पोरेटी यांच्या पाठीशी त्यांचे कार्यकर्ते तर आहेच परंतु त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव खूप मोठा आहे. मनोहर पा. पोरेटी यांनी ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष पर्यंत मजल मारलेली आहे. अनेकदा निवडणुकीत विजयी झाले आहेत.
मनोहर पोरेटी हे आपल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गावोगावी कॉर्नर सभा घेऊन व प्रचार रॅली काढून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत. मनोहर पोरेटी यांचा शांत स्वभाव हा त्यांना विजयी करेल असा मतदारांचा विश्वास आहे.
