ब्रेकिंग न्युज
गडचिरोली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा रद्द

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१७ नोव्हेंबर)
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा-६८ क्षेत्राचे भाजपा- महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची जाहीर सभा गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालय च्या प्रांगणात धानोरा रोड येथे दुपारी ११.०० ठेवण्यात आली होती. पण अपरिहार्य कारणास्तव गृहमंत्री अमित शहा यांची सभा रद्द करण्यात आलेली आहे व ते नागपूर वरून दिल्लीकडे रवाना झालेले आहेत.
गडचिरोली सह विदर्भातील चारही सभा रद्द होण्याची कारणे अजून पर्यंत गुलदस्त्यातच असल्याने सभास्थळी असंख्य कार्यकर्ते व मतदार यांचा हिरमोड झालेला दिसत आहे.
जाहिरात
